BNR-HDR-TOP-Mobile

kudalwadi : व्हॉलीबॉल स्पर्धेत रेहमानी स्पोर्टस क्लब संघ विजेते

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – चिखली, कुदळवाडी येथील कुदळवाडी स्पोर्टस क्लबच्या वतीने डे-नाईट ऑल इंडिया व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये रेहमानी स्पोर्टस् क्लब या संघाने विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेचे उद्घाटन महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक संजय नेवाळे, कामगार नेते कैलास कदम, माथाडी कामागर नेते इरफान सय्यद, उद्योजक लतीफ खान, सतीश बोराटे, राष्ट्रवादी सेवादलाचे शहराध्यक्ष आनंदा यादव, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, याकुब खान, बीना स्कूलचे इकबाल खान, शफीक शहा, दस्तगीर मणियार, संदिप मोरे, भारिपचे भोसरी अध्यक्ष आमीर खान, भोसरी मनसे अध्यक्ष राहुल जाधव, मीना मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी परवेज सिद्दीकी, प्रवीण मौर्या, अशफाक सिद्दीकी, मनोज गुप्ता, जमिरूल्ला चौधरी, मेहताब खान, एजाज चौधरी, मुजफ्फर सिद्दीकी, मकसूद कपूर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाकीब खान यांनी केले.

HB_POST_END_FTR-A4

.