Kudalwadi Crime News : पान टपरी आणि गोडाऊनमधून सहा लाख 65 हजारांचा गुटखा, विदेशी सिगारेट जप्त

एमपीसी न्यूज – शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि वैज्ञानिक इशारा नसलेले विदेशी सिगारेट विक्री केल्याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुदळवाडी येथे एका पान टपरी आणि गोडाऊनवर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने सहा लाख 65 हजार 513 रुपयांचा साठा जप्त केला आहे.

पुनाराम वोराराम सीरवी (वय 22, रा. शाहूनगर, चिखली), नवनाथ मनोहर मोरे (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस नाईक विष्णू भारती यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळवाडी येथे असलेल्या डायमंड पान टपरी मध्ये आणि भास्कर चौधरी यांच्या गोडाऊनमध्ये आरोपींनी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून ठेवला. टपरीमधून हा प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी टपरी आणि गोडाऊनवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी गुटखा आणि वैज्ञानिक इशारा नसलेल्या विदेशी सिगारेट असा एकूण 6 लाख 65 हजार 513 रुपयांचा ऐवज जप्त केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.