Kudalwadi : स्थानिक विकास निधी आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने उभारले स्वच्छतागृह

एमपीसी न्यूज – चिखली-कुदळवाडी येथे ठिकठिकाणी स्वच्छतागृह बांधण्यात यावी, अशी मागणी वारंवार महापालिकेकडे केली होती, अशी मागणी स्विकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापालिकेकडे वारंवार केली होती. पण, त्याची महापालिकेने दखल घेतली नाही. कुदळवाडीच्या विकासासाठी स्थानिक विकास निधीमार्फत आणि आमदार महेश लांडगे यांच्या सहकार्याने कुदळवाडीत स्वच्छतागृहे बांधले.

कुदळवाडी येथे ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात यावी, ही नागरिकांची मागणी होती. स्वच्छतागृह नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. कुदळवाडीत लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. कुदळवाडीत आतापर्यंत महापालिकेने एकही स्वच्छतागृह बांधलेले नाही. तरी जेथे जागा उपलब्ध होईल तेथे स्वच्छतागृहे बांधण्यात यावी.

  • स्थापत्य विभाग अधिका-यांना वारंवार फोनवरुन स्वच्छतागृहे बांधण्यासाठी संपर्क साधून जागा ही दाखविली तरी अधिका-यांनी अजून केले नाही. आता तरी आयुक्तांनी या मागणीची दखल घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.