Kudalwadi : कुदळवाडीत कॅंडल मार्च काढून शहीद जवानांना श्रध्दांजली

एमपीसी न्यूज – कुदळवाडी ते पवार वस्तीपर्यंत लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना कॅंडल मार्च काढून श्रध्दांजली अर्पण केली.

लोक जनशक्ती पार्टी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नसिम शेख यांच्या नेतृत्वाखाली सीआरपीएफच्या शहीद झालेल्या जवांनाना पायी कॅंडल मोर्चा काढून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आकुबभाई, सदर खाव, जनाब मुक्ती अबीद रज्जा, अजहर शाह, सोबल सिद्दीकी, फैय्याज सिध्दीकी, रेहान खान, राकेश यादव, अली रहमानी, प्रवीण कांबळे, संदीप साळवे, मोलाना शाहबाज, आलम इनकी आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.