Kurkumbh : इटर्नस फाईन केमिकल्समधील कामगारांना 15,500 ची वेतनवाढ

एमपीसी न्यूज- कुरकुंभ येथील इटर्नस फाईन केमिकल्समध्ये नुकताच कंपनी व्यवस्थापन आणि पुणे जिल्हा मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्यामध्ये वेतनवाढीचा त्रैवार्षिक करार झाला. या अंतर्गत कामगारांना 3 वर्षाकरिता 11 हजार 500 ते 15 हजार 500 रुपयांची वेतनवाढ झाली आहे.

सदर करारावर व्यवस्थापनाच्या वतीने सुरेशन (व्हाईस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग व प्रोजेक्ट,) लक्ष्मण पुत्रन (जनरल मॅनेजर एच.आर. कॉपोरेट) किरण मालेवाडी (जनरल मॅनेजर मॅन्यु.) प्रभात पात्रा (मॅनेजर एच.आर.) यांनी व पुणे जिल्हा मजदूर संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उमेश विश्वाद, कामगार प्रतिनिधी शौकत शेख, गोरख कोकाटे, महेश अहिवळे, रवींद्र पवार व सुनील निगडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरीच्या कार्यक्रमाला अखिल भारतीय बिडी मजदूर महासंघाचे केंद्रीय महामंत्री उमेश विश्वाद उपस्थित होते. या वेतनवाढ करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

व्यवस्थापन व संघटना यांच्यामधील हा पाचवा करार असून या करारातील वाढीमुळे कराराच्या कालावधीत कामगारांचे किमान वेतन 22 हजार 500 ते कमाल वेतन 52 हजार 500 पर्यंत झालेले आहे. या कंपनीत विविध प्रकारची रसायने, सुगंधी उद्योग, साबण डिटर्जंट उद्योगाला लागणारी मुलद्रव्यांचे उत्पादन केले जाते या आस्थापनेतील सर्व कामगार पुणे जिल्हा मजदूर संघ संलग्न भारतीय मजदूर संघाचे सभासद आहेत.

वेतनवाढीच्या करारातील ठळक मुद्दे

# बेसिक मध्ये 5 हजार 200 रुपये घरभाडे भत्ता२ हजार ७०० रुपये प्रवास भत्ता अकराशे रुपये, शिक्षण भत्ता एक हजार रुपये व वैद्यकीय भत्ता एक हजार 626 रुपये अशी वाढ मिळणार.

# 20 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना सर्व्हीस इन्क्रिमेंट म्हणून प्रतिमाह अडीच हजार रुपये, 15 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना प्रतिमाह दोन हजार, 10 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना प्रतिमाह दीड हजार मिळणार तर 5 वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना एक हजार रुपये मिळणार

# तीन वर्षे नोकरी झालेल्या कामगारांना 75 हजार व 10 वर्षे नोकरी झालेल्या कामगारांना 1 लाख 50 हजार रूपये बिनव्याजी कर्ज मिळणार तसेच कामगारांच्या मुला मुलींच्या लग्नाकरिता विशेष बाब म्हणून 2 लाख कर्ज मिळणार

# वार्षिक वेतनवाढ म्हणून रू 150/- मिळणार. शैक्षणिक मदत म्हणून कामगारांच्या पाल्यांकरिता 1 ली ते 10 वी पर्यंत प्रतिवर्षी दोन हजार रुपये व पदवी पर्यंत पाच हजार रुपये मिळणार

# कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता 2 लाख रूपयांची मेडीक्लेम पॉलिसी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.