Kurwande : आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून अखेर धनगर वस्तीवर पोहचली वीज

एमपीसी न्यूज : मागील अनेक वर्षांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या कुरवंडे (Kurwande) येथील धनगर वस्तीवर देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नांमुळे वीज पोहचली आहे.

मावळ तालुक्यातील कुरवंडे येथील धनगर वस्तीवर अद्यापपर्यंत वीज पोहचली नसल्याने आताच्या आधुनिक काळात देखील येथील नागरिक अंधारातच राहत होते. विद्युत पुरवठया अभावी तंत्रज्ञानाच्या युगात देखील या वस्तीवर वास्तव्यास असणारे नागरिक टेलिव्हिजन व इतर तांत्रिक साधनांपासून वंचित होते. येथील लोकवस्तीवर वीज पोहचविण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी शासनाकडे पाठपुरावा करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 12 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता.

या निधीतून धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा करण्यासाठी 28 विजेचे खांब, विद्युत वाहक तारा व 63 केव्हीए क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षा निमित्त आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत उद्घाटन करून येथील धनगर वस्तीवर विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. मागील अनेक वर्षे येथील नागरिक विजेची मागणी करून देखील त्यांची कोणी दखल घेत नव्हते. मात्र त्यांची समस्या सोडविल्याने येथील नागरिकांनी आमदार शेळके यांचे आभार मानले आहेत.

“दुर्गम भागात वीज पुरवठा पोहचल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटले. आजही अनेक नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक असून त्यासाठी आश्वासक पावले उचलणे ही आपली जबाबदारी आहे.” – आमदार सुनिल शेळके

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, दिपक हुलावळे, महावितरणचे अभियंता विष्णु पवार, सरपंच अनिता कडू, उपसरपंच सुप्रिया पडवळ, जयश्री कडू, सखाराम कडू, विशाल कडू, नारायण कडू, सुनिल ढोरे, बाळासाहेब भानुसघरे, संतोष राऊत, अमोल केदारी, बाबा मुलाणी, सुरेश कडू, संदीप आंद्रे,सागर बोडके, गणेश थिटे, संजय बाविस्कर,अनिल मालपोटे, अजिंक्य टिळे, दिनेश गायकवाड,गोरख हिंगे, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Today’s Horoscope 16 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.