सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Kusgaon Toll Naka : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळ कुसगाव टोल नाक्यावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती (Kusgaon Toll Naka) मार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातातील जखमींना वेळीच योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे लोणावळ्यातील कुसगाव टोल नाका येथे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या इमारतीत ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी लोणावळ्याचे माजी उपाध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली.

गेल्या आठवड्यात शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचा एक्स्प्रेस-वेवरील भाताण बोगद्याजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. वैद्यकीय सुविधांअभावी मेटे यांचा अपघातानंतर तासाभरात मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या चालकाने केला आहे. मेटे यांच्याप्रमाणेच या रस्त्यावर हजारो नागरिकांचा मृत्यू केवळ वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने झाला आहे. हे रोखण्यासाठी लोणावळा शहरात ट्रॉमा केअर सेंटर असणे गरजेचे आहे.

Swine Flu : कोरोनानंतर आता स्वाईन फ्ल्युचे संकट; शहरात 21 रुग्ण, दोघांचा मृत्यू

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) यापूर्वी कुसगाव टोल नाका येथे मोठी इमारत बांधली होती. तिथे एक हॉटेल प्रस्तावित होते. पण, ते सुरू झाले नाही. ही भव्य इमारत अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहे. इमारतीसमोरील जागाही मोठी असल्याने वाहनेही उभी करता येतात.

“अपघातांचा विचार केला तर सर्वाधिक अपघात घाट (Kusgaon Toll Naka) परिसरात होतात. येथे अपघात झाल्यास रुग्णांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात किंवा निगडीतील लोकमान्य रुग्णालयात न्यावे लागते. ओझर्डे येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात आले आहे, मात्र तेही संयुक्त नसल्याने सरकारने या पडक्या जागेचा विचार करून तेथे ट्रॉमा केअर सुरू करावे, जेणेकरून अपघातानंतरच्या सुवर्णकाळात रुग्णांना उपचार मिळू शकतील,’ अशी मागणी पुजारी यांनी केली आहे.

spot_img
Latest news
Related news