Kushal Badrike: ‘मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय?’

Kushal Badrike: 'Do you know what you are doing, makeup or lighting Diwali fireworks?' कॉमेडीवीर कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट

एमपीसी न्यूज – मागील तीन महिने मनोरंजन क्षेत्राला परीक्षेचे गेले. सर्व प्रकारचे शूटिंग थांबले होते. आता अनलॉक २ मध्ये काही अटींसह शूटिंगला सुरुवात झाली आहे. येत्या सोमवारपासून मालिकांचे नवीन भाग प्रक्षेपित होणार आहेत. पुन्हा ती कटकारस्थाने, इमोशनल सीन प्रेक्षक अनुभवणार आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’च्या शूटिंगलाही सुरुवात झाली आहे. कुशल बद्रिके व श्रेया बुगडे यांनी शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोसोबत कुशलने लिहिलेलं अतरंगी कॅप्शन मात्र विशेष लक्ष वेधून घेत आहे.

‘आज चार महिन्याने हा माझ्या चेहऱ्याला मेकअप करतोय. मेकअप करतोय का दिवाळीचा फटाका लावतोय काय माहित’, असं मजेशीर कॅप्शन कुशलने त्याच्या फोटोला दिलं आहे. या फोटोत पीपीई किट घालून मेकअप आर्टिस्ट कुशलचा मेकअप करताना दिसतोय.

_MPC_DIR_MPU_II

मेकअप करताना त्याने राखलेलं सोशल डिस्टन्सिंग पाहून कुशलला दिवाळीला फटाका लावत असताना कसे लांब उभे राहतो त्याची आठवण झाली. सेटवर मोजकी लोकं, मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन अशा अनेक गोष्टी या वेळी सांभाळल्या जात आहेत.

प्रेक्षकांच्या या आवडत्या कार्यक्रमाचं शूटिंग जरी चालू झालं असलं तरी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणात प्रेक्षकांना सहभागी होता येणार नाही. याबद्दल बोलताना कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे म्हणाली, ‘येत्या काळात ‘न्यू नॉर्मल’मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला स्टुडिओत अनुभवता येणार नाही. खरंतर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्वाचे आहेत. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळ्या प्रकारची स्किट्स आम्ही सादर करू. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवानी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची मी खात्री देते’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.