Nashik News : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर

नाशिकमध्ये आज पुरस्कारांची घोषणा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झाला आहे.

10 मार्च 2021 रोजी नाशिक येथे होणार्‍या विशेष सोहळयात कर्णिक यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. एक वर्षाआड दिल्या जाणार्‍या जनस्थान पुरस्काराचे स्वरूप एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे स्वरूप आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणार्‍या मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या साहित्यकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

यापूर्वी विजया राजाध्यक्ष, अरूण साधू, भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, विजय तेंडुलकर अशा दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.