Pune : टोळक्याची मजुराला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – येरवडा येथे एका मजुराला सात जणांच्या टोळक्याने कोयता तसेच लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.26) शांतीनगर येथे घडली. घटनेत मजूर जखमी झाले आहे.

याप्रकरणी राजेश पिल्ले (वय 45, रा. शांतीनगर, येरवडा), यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत बनसोडे यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिल्ले हे त्यांच्या घरी झोपलेले असताना आरोपी बनसोडे यांने बेकायदेशीर मंडळी जमवून या टोळक्याने फिर्यादी यांच्या घराच्या दारावर दगड मारले. पिल्ले हे बाहेर आले असता आरोपी बनसोडे याने त्यांच्या डोक्यावर मागील बाजूस कोयत्याने मारले. तर अन्य एकाने लोखंडी पाईप त्यांच्या डोक्यात मारला. तसेच सर्वांनी मिळून लाथाबुक्यांनी माहराण करून दुखापत केली.

विश्रांतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.