BNR-HDR-TOP-Mobile

Nigdi : कोयत्याच्या धाकाने मजुराला लुटले

एमपीसी न्यूज – कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी एका मजुराला शिवीगाळ करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना गुरूवारी (दि.19) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तळवडे ते देहूगाव रस्त्यावर घडली.

शंकर ब्रम्हदेव शिंदे (वय-26, रा. ओटा स्किम, निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्याम चरण सरपाते (वय-24, रा. तळवडे) याच्यासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गुरूवारी सायंकाळी तळवडे ते देहूगाव रस्त्यावरून जात होते. यावेळी आलेल्या आरोपींनी त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. दमदाट करत शिवीगाळ केली. त्यांच्याकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने लुटून नेला. देहूरोड़ पोलीस तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3