Sangvi : खोट्या सोन्याच्या बांगड्या देऊन घेतले लाख रुपयांचे कर्ज

एमपीसी न्यूज – कोटिंग केलेल्या बांगड्या देऊन एका कंपनीकडून एक लाख चार हजार रुपयांचे कर्ज घेतले. हा प्रकार बुधवारी (दि. 29) सांगवी येथे उघडकीस आला.

अशोक शिवाजी माळी (वय 38, रा. पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय कडूबाळ गायकवाड (वय 39 रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक माळी हे एका खाजगी कंपनीत काम करतात. या कंपनीकडून विजय गायकवाड याने 10 नोव्हेंबर 2018 रोजी एक लाख चार हजार रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज घेताना विजय गायकवाड यांनी कंपनीकडे सोन्याचे कोटिंग केलेल्या बांगड्या दिल्या. या बांगड्या बनावट असल्याचे लक्षात येताच कंपनीकडून विजय गायकवाड यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.