Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे येथे जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे – चाकण राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत असताना तळेगाव दाभाडे हद्दीतील पैसा फंड काच कारखान्यासमोर शनिवारी (दि.17) दुपारी 2:30 वा. पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.

त्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यामुळे परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.

जलवाहिनी फुटून पाणी राष्ट्रीय मार्गावर आल्याने दुचाकी व कारचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागली. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी संरक्षक पत्रे उभारावी तसेच जागोजागी सूचना फलक लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.