Pimpri Crime News : एक लाखांच्या रकमेसह पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – एका महिलेची पर्स अज्ञात चोरटयांनी चोरून नेली. त्या पर्समध्ये एक लाख रुपये रक्कम होती. ही घटना 2 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेपाच वाजता सेनट्री चाळ, पिंपरी येथे घडली.

रुक्मिणी जिया धुंबड (वय 50, रा. पाटीलनगर, चिखली) यांनी याप्रकरणी गुरुवारी (दि. 7) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या जुन्या घरी सेनट्री चाळ, पिंपरी येथे कागदपत्र व सामान घेण्यासाठी दोन ऑक्टोबर रोजी आल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची 100 रुपये किमतीची पर्स चोरून नेली. त्या पर्समध्ये एक लाख रुपये रोख रक्कम होती. याप्रकरणी पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.