Pune News : शरीरसंबंधाचे फोटो काढून नवऱ्याला दाखवण्याची धमकी देत विवाहितेकडून लाखो रुपये लाटले

एमपीसी न्यूज : ओळख असलेल्या विवाहित महिलेला घरी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. लपून त्याचे फोटोही काढले. नंतर हेच फोटो विवाहित महिलेचा पती आणि सासरच्या लोकांना दाखवीन अशी धमकी देऊन महिलेकडून लाखो रुपये लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

याप्रकरणी एका 32 वर्षीय विवाहित महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी गणेश जगन्नाथ सोनवणे आणि त्याची पत्नी श्रद्धा गणेश सोनवणे या दोघा पती पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की आरोपी आणि फिर्यादी महिला एकमेकांच्या ओळखीचे आहे. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी पीडित महिलेला स्वतःच्या घरी घेऊन गेला.  त्या ठिकाणी त्याने तिच्या सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्याचे फोटो काढून त्यांनी हे फोटो नवरा आणि सासर्‍याला दाखवण्याची धमकी देऊन तिच्याकडून सहा तोळे सोन्याचे दागिने घेतले.

तसेच तिला पाच लाख 60 हजार रुपये कर्ज काढण्यास भाग पाडून हे पैसे देखील स्वतः घेतले. तर आरोपीची पत्नी ने पीडित महिलेचा साडेतीन तोळ्याचा सोन्याचा हार घेऊन तिची फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.