Pimpri : लक्ष्मणभाऊ, महेशदादांचे मंत्रीपदाचे स्वप्न पुन्हा भंगले

एमपीसी न्यूज – शिवसेना सोबत येत नसल्याने भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे मंत्री होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले आहे. शहराला मंत्रीपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शिवसेना-भाजप युती करून निवडणूक लढले. परंतु, मुख्यमंत्री पद देत नसल्याने शिवसेना भाजपसोबत गेली नाही. त्यामुळे भाजपने अल्पमतातले सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे युतीचे सरकार येणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सरकार येईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा जगताप आणि लांडगे यांना होती. परंतु, भाजपने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे जगताप आणि लांडगे यांचे मंत्रीपदाचे स्वप्न भंगले आहे.

दरम्यान, फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर शहराला मंत्रीपद देण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. महापालिकेत सत्ता येऊन तीन वर्ष झाले. तरी, मंत्रीपद काही मिळाले नव्हते. यावेळी मिळेल अशी अपेक्षा असतानाच भाजपचे सरकार स्थापन होऊ शकले नाही. त्यामुळे शहराला मंत्रीपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.