Laxmi bomb releasing on OTT – ‘लक्ष्मी बॉम्ब’ करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर धमाका

Lakshmi bomb dropped on OTT - 'Lakshmi bomb' will explode on OTT platform अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे.

एमपीसी न्यूज – आपल्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांमुळे अक्षयकुमारने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे बॉलिवूडचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भुताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो.

अक्षयने त्याच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच पोस्टर प्रदर्शित करताना त्याने कुठलाही संप्रदाय दुखावणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे असे म्हटले आहे.  हे पोस्टर शेअर करत त्याने छान असे कॅप्शन दिले आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो घरी आरामात बघा. मला दोन गोष्टींची खात्री आहे. तुम्हाला हसायला ही येईल आणि भीतीही वाटेल. चित्रपट प्रदर्शित होणार डिझनी हॉटस्टारवर’ असे अक्षयने म्हटले आहे.

अक्षयने एका मुलाखतीमध्ये या चित्रपटातील ही भूमिका साकारणे किती आव्हानात्मक होते हे सांगितले. ‘माझ्या ३० वर्षांच्या करिअरमधील सर्वात आव्हानात्मक भूमिका होती. मानसिक पातळीवर माझ्यासाठी हे फार कठीण होते. मी अशी भूमिका यापूर्वी कधीही साकारली नव्हती आणि माझ्या या भूमिकेमुळे कुठलाही संप्रदाय दुखावणार नाही याची काळजी घेतलीय’ असे अक्षयने म्हटले आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.