Lalbaughcha Raja: इतिहासात पहिल्यादांच लालबागचा राजाचा गणेशोत्सव रद्द; रक्तदान, प्लाझ्मा दानचे कॅम्प उभारणार

lalbaugcha Raja Ganeshotsav: For the first time in history, Ganeshotsav of Lalbaugh Raja is canceled; Blood donation, plasma donation camps will be set up

एमपीसी न्यूज- मुंबईचा प्रसिद्ध लालबागचा राजा या मंडळाने गणेश उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात व राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मंडळ सामिनीने गणेशोत्सव रद्द करून आरोग्य उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

11 दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या 11 दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. तसेच LOC आणि LAC वर प्राण गमावलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे.


दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात. कोरोनाच्या काळात ही गर्दी टाळण्यासाठी मंडळाने यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

लालबागच्या राजाला 86 वर्षांची पंरपरा आहे. मागील 86 वर्षांपासून लालबागमधील मार्केटमध्ये राजाची 14 फुट उंचीची मूर्ती विराजमान होते. मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात.

मात्र, कोरोनामुळे यंदा गणेशोत्सवाऐवजी अकरा दिवसांसाठी रक्तदान शिबिरं आणि प्लाझमा थेरपी शिबिरं भरवण्यात येणार आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.