Dehuroad : गुप्तदान करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाचे दागिने केले लंपास

एमपीसी न्यूज – गुप्त दान तुमच्या हातून करायचे आहे, तुमचे दागिने पिशवीत टाका म्हणत हात चालाखीने 68 वर्षीय नागरिकाचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.16) दुपारी देहुरोड (Dehuroad) येथील एका पान स्टॉलवर झाला आहे.

Dehuroad : सव्वा लाख रुपयांच्या गांजासह तरुणाला अटक

याप्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात धनसिंग लक्ष्मण ठाकूर (वय 68 रा. किवळे) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे स्टॉलवर असताना आरोपी तेथे आले व त्यांनी गुप्त दान कराये आहे. ते तुमच्या हातून करायचे आहे , त्यासाठी फिर्यादीच्या समोर एक पांढरी पिशवी समोर करत त्याच झेंडूची फुलांचा हार, बिस्कीटचा पुडा, शंभर व पाचशेच्या नोटा होत्या.

त्या फिर्यादीला गळ्यातील सोन्याची साखळी, सोन्याची अंगठी असा एकूण 70 हजार रुपयांचे दागिने टाकून दहा मिनीटासाठी पिशवीत दागिने राहू द्या म्हणत हात चालाखीने दागिने लंपास केले. यावरून देहुरोड (Dehuroad) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.