Moshi : अडीच लाखांचे 62 वॉटर हिटर गोडाऊनमधून लंपास

एमपीसी न्यूज – कंपनीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 46 हजार 650 रुपये किमतीचे 62 वॉटर हिटर चोरून नेले. ही घटना 2 जून ते 14 जून या कालावधीत संतनगर मोशी येथे घडली.

गणपतीगौडा सिदगौडा पाटील (वय 41, रा. संतनगर मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांचा वॉटर हिटरचा व्यवसाय आहे. त्यांचे संतनगर मोशी येथे गोडाऊन आहे. त्यांचे गोडाऊन 2 जून ते 14 जून या कालावधीत बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने गोडाऊनचा दरवाजा उघडला. कंपनीतून विविध आकाराचे 2 लाख 46 हजार 650 रुपये किमतीचे 62 वॉटर हिटर चोरट्यांनी चोरून  नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.