-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chikhali : जाधववाडी, बो-हाडेवाडीतील शाळेची इमारत, रस्त्यांच्या कामाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, चिखली येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये जाधववाडी येथील माध्यमिक शाळेची इमारत बांधणे, बो-हाडेवाडी येथील गायरान जागेवर शाळा इमारत बांधणे, जीवन शाळेजवळील मैदान विकसित करणे, विकास आराखड्यातील रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे.

महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम झाले. नगरसदस्या अश्विनी जाधव, सारिका सस्ते-बो-हाडे, साधना मळेकर, स्विनल म्हेत्रे, माजी नगरसदस्य सुनील लोखंडे, शांताराम भालेकर, माऊली जाधव, नामनिर्देशित फ प्रभाग सदस्य दिनेश यादव, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नितीन देशमुख, दिलीप भोसले, उप अभियंता संजय माने, मुख्य आरोग्य निरीक्षक रमेश भोसले, जनता संपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते नितीन बो-हाडे, संतोष जाधव, आप्पा बालघरे, गणेश किवळे, शिवकुमार बायस, रवि जांभुळकर, भरत नरवड, सुरेश सुर्यवंशी, अंकुश जाधव, जयंत बोडे, राजेश शेळके, शामराव आल्हाट, हनुमंत बोराडे, नामदेव याउल, किसन आल्हाट, जयवंत थोरात, तानाजी काळे, सदाशिव आल्हाट, योगेश बो-हाडे, वसंत बो-हाडे, सुधीर सस्ते, राजेंद्र सस्ते, प्रिती बोर्डे, रेखा चिलवंत आदी उपस्थित होते.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणे, तसेच सेक्टर १६ राजे शिवाजीनगर भागातील काँक्रिटीकरण रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ, तळई गार्डन परिसर विकास प्रकल्पाचे व चिखली गावातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले. तसेच तळई गार्डन लगत सीएसआर मार्फत विकसित ई – टॉयलेट प्रकल्पाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

बो-हाडेवाडी येथील शाळेचे जागेचे एकूण क्षेत्रफळ ४१०० चौरस मीटर असून ३६११ चौरस मीटर बांधकाम होणार असून या शाळेस ३ मजले असणार आहेत प्रत्येक मजल्यावर क्लास रुमसह स्त्री/पुरुषांसाठी टॉयलेटसह बाथरुम असणार आहेत. तसेच मोठा हॉल, सायन्स व कॉम्प्यूटर लॅब, तसेच प्रशस्त वाहनतळ असणार आहेत. या शाळेच्या बांधकामास सुमारे १२ कोटी ३८ लाख रुपये इतका खर्च येणार असून या परिसरातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ होणार आहे.

तसेच जाधववाडी येथील गट नं.६०६ आरक्षण क्र.१/४४६ येथे माध्यमिक शाळेच्या जागेचे एकूण क्षेत्रफळ १५ हजार २९२ चौरस मीटर असून ७६३८ चौरस मीटर इतके इमारतीचे बांधकाम होणार असून यात ४ मजल्यावर ३८ क्लास रुमसह मोठा हॉल, सायन्स व कॉम्प्यूटर लॅब, तसेच प्रशस्त वाहन तळ असणार आहेत. तसेच स्त्री/पुरुषांसाठी टॉयलेटसह बाथरुम असणार आहेत. या शाळेच्या बांधकामास सुमारे १२ कोटी ९३ लाख रुपये इतका खर्च येणार असून परिसरातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.