Pimpri : मोशीतील 18 मीटर रस्त्याचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते भूमीपूजन

एमपीसी न्यूज – मोशीतील हजारे वस्ती ते जांभूळ शेतीकडे जाणा-या 18 मीटर रस्त्याच्या कामाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) भूमीपूजन करण्यात आले. शेतक-यांच्या मागणीनुसार हा रस्ता केला जात आहे. यामुळे शेतक-यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी रस्ता मिळणार आहे. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कमी होईल,असे आमदार लांडगे म्हणाले.

यावेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक लक्ष्मण सस्ते, नगरसेविका सुवर्णा बु-र्डे, मधु बोराटे, संजय हजारे, अजित सस्ते, गणेश सस्ते, चिन्मय सस्ते, पिंटू  सस्ते, उपस्थित होते.

पिंपरी महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून रस्ता झाला नव्हता. हजारे वस्ती ते जांभूळ शेतीकडे जाताना नागरिकांना लांबून वळसा घालून जावे लागत होते. जांभूळ शेती परिसरातील घरांना, शेतीकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे रस्त्याची गरज होती. शेतक-यांकडून रस्ता करण्याची मागणी केली जात होती. त्यासाठी स्थानिक नगरसेवक लक्ष्मण सस्ते यांनी महापालिका आणि आमदार लांडगे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर महापालिकेने रस्त्याच्या कामाला मान्यता दिली.

हा रस्ता झाल्यामुळे शेतक-यांना वळसा घालून जावे लागणार नाही. आळंदीला जाण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गावरुन जावे लागत होते.आळंदीला जाणा-या नागरिकांना बायपास मार्ग मिळेल. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कमी होईल. या रस्त्याला जोडून अंतर्गत रस्ते देखील केले जाणार आहेत. त्याचे देखील काम सुरु आहे. रस्ता झाल्याने शेतक-यांना जमिनी विकसित करता येतील. मोशीच्या विकासात भर पडेल. वर्षभरात रस्ता खुला होणार आहे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.