Sinhagad landslide : सिंहगड येथे कोसळली दरड; तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – सिंहगड (Sinhagad landslide) येथे काल दरड कोसळली. अचानक कोसळलेल्या दरडीत अडकून एका तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. हेमांग गाला असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हेमांग आणि त्याचे मित्र काल शनिवारी सुट्टी असल्याने ट्रेकिंगसाठी सकाळी सिंहगड चढण्यासाठी आले होते. दरम्यान अचानक दरड (Sinhagad landslide) कोसळली. या दरड अपघातानंतर हेमांग गाला बेपत्ता झाला. वन विभागाचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले.

Maharashtra Political Crises : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

अथक शोधकाऱ्यानंतर काल रात्री 11.30 च्या सुमारास हेमांग गाला याचा मृतदेह दगडांच्या ढिगाऱ्याखाली सापडला. दगडांखाली सापडल्याने या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. अशी माहिती विठ्ठल बनोटे, आपत्ती व्हायस्थापन अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात यांनी दिली.

जून महिना उजाडला तरी पावसाने दडी मारलेलीच आहे, मात्र तरीही दरड कोसळली म्हणून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत विचारले असता विठ्ठल बनोटे म्हणाले, दगड ठिसूळ असतील त्यामुळे पडले असावेत असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

अधिक माहिती देताना प्रदीप संकपाळ म्हणाले की, सकाळी तरुणांचा गट काल सकाळी सिंहगडला ट्रेकिंग साठी आला होता व ट्रेकिंग सुरु केले. शनिवारी सुट्टी असल्याने गडाच्या परिसरात खूप गर्दी होती. संध्याकाळी 6 ते 7 वा दरम्यान गडावर पोहोचल्यानंतर शिरगंती करण्यात आली. तेव्हा कळले की एक तरुण ट्रेक्कर बेपत्ता आहे.
त्यांनी त्या तरुणाच्या घरी फोन केला पण तो तिथे पोहोचला नव्हता. त्यामुळे त्यांनी आजूबाजूला शोध घेतला पण तो तरुण सापडला नाही.

अखेरीस त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार केली. वन विभागालाही याबद्दल कळवले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व स्थानिकांनी गड परिसराची पाहणी केली. त्यांना गडाच्या कल्याण दरवाज्याजवळ दरड कोसळल्याची दिसले. दरड 100 फूट खोल दरीत कोसळली होती. वन विभाग कर्मचाऱ्यांनी व स्थानिक तरणांनी बचाव कार्य सुरु केले. त्यांना रात्री 11.30 वा च्या सुमारास हेमांगचा मृतदेह सापडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.