Express Way: आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून वाहतूक विस्कळीत

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ आज (रविवारी) पहाटे दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

लोणावळा व खंडाळा घाट परिसरात शनिवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रात्री पावसाच्या सोबत वारा देखील असल्याने खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ डोंगराचा काही भाग सरकून द्रुतगती मार्गावर आला आहे.

दगड व माती रस्त्यावर आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली आहे. घटनेची माहिती समजताच खोपोली बोरघाट पोलीस व आयआरबीची मदत यंत्रणा, ‘अपघातग्रस्तांच्या मदतीला’ या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले असून मार्गावरील दरड बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

सकाळी पावणेसात वाजता दरड बाजूला करत याठिकाणी थांबविलेली वाहतूक पुन्हा हळूहळू सुरु करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.