Lonavala : मुंबई – पुणे लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत

मिडल लाईन बंद

एमपीसी न्यूज – मुंबई – पुणे  लोहमार्गावरील वाहतूक सुरळीत झाली असून सकाळच्या सर्व रेल्वे गाड्या वेळेवर धावत आहे.  रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप लाईनवरील दगड बाजुला करत ती सुरु करण्यात आली असली तरी सकाळी साडेसात वाजेपर्यत मिडल लाईन ही बंदच आहे. या लाईनवरील दगड बाजुला करण्याचे काम सुरु असून मिडल लाईन सुरु होण्यास अजून काहीसा कालावधी लागणार आहे. मिडल लाईन बंद असली तरी त्याचा वाहतूकीवर परीणाम झालेला नाही.

मुंबई पुणे लोहमार्गावर मंक्की हिल याठिकाणी शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अप व मिडल या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती.

शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास देखिल याच ठिकाणी रेल्वे इंजिनच्या समोर दरड कोसळली होती. सुदैवाने त्यावेळी वाहतुकीवर परिणाम झाला नव्हता. मात्र शनिवारी दरड अप व मिडल या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. दरड पडलेल्या परीसरात पाऊस व अंधारामुळे कामात अडथळा येत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.