Talegaon News : हभप लंकुजी गणुजी मांडेकर यांचे निधन

गावात ढोल लेझीम,एक तारी भजन सुरू करण्यात त्यांचे अनमोल योगदान होते. अनेक ऐतिहासिक नाटकांमध्ये त्यांनी त्या काळात उठावदार भूमिका केल्या.

एमपीसीन्यूज : वारंगवाडी ( ता. मावळ) येथील वारकरी संप्रदायातील अध्वर्यु , जुन्या पिढीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, हभप लंकुजी गणुजी मांडेकर यांचे वयाच्या 95 व्या‌ वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे दोन मुले, पत्नी, पुतणे, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.

अतिशय कणखर व बाणेदार स्वभाव असलेले लंकुजी मांडेकर यांनी उत्तम शेती व्यवसाय करताना त्याला दुग्धव्यवसायाची जोड दिली. जुन्या काळापासून अविरत पंढरीची वारी केली. अतिशय हजरजबाबीपणा, गणित, संस्कृत, मोडी भाषा त्यांना अवगत होती.

गावात ढोल लेझीम,एक तारी भजन सुरू करण्यात त्यांचे अनमोल योगदान होते. अनेक ऐतिहासिक नाटकांमध्ये त्यांनी त्या काळात उठावदार भूमिका केल्या.

अतिशय प्रतिकूल काळात अनेक वर्षे लंकुजी तात्यांनी एस.टी. महामंडळाच्या सहकार्याने दरवर्षी पंचक्रोशीतील ग्रामस्थांना चारधाम यात्रा घडवली. सुप्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

भंडारा डोंगर दशमी समितीचे कोठीप्रमुख हभप भरतशेठ मांडेकर व प्रगतीशील शेतकरी सुरेश मांडेकर यांचे ते वडील, तर उद्योजक रामदास मांडेकर व शाम मांडेकर यांचे ते आजोबा होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.