Chikhali : उघड्या खिडकीवाटे घरातून लॅपटॉप, मोबईल पळवला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – घराच्या उघड्या खिडकीवाटे घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी घरातून लॅपटॉप आणि मोबईल फोन चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 11) पहाटे म्हेत्रेवस्ती, चिखली येथे घडली.

युगांत बाळासाहेब चव्हाण (वय 26, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली) यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चव्हाण यांच्या घराच्या उघड्या खिडकीतून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घरात प्रवेश केला. घरातील सोफ्यावर ठेवलेला 25 हजारांचा लॅपटॉप आणि 8 हजारांचा मोबईल फोन असा एकूण 33 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार बुधवारी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.