BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासादरम्यान लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – मुंबईहून पुण्याला बसमधून येत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी पावणेसात ते सव्वाअकराच्या सुमारास घडली.

सचिन सुरेश तळावलीकर (वय 50, रा. चिंचवडगाव) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन गुरुवारी दादर येथून पुण्याला येत होते. सकाळी पावणेसातच्या सुमारास ते दादर येथून शिवनेरी बसमध्ये बसले. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून 20 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेला. सचिन वाकड येथे उतरले असता हा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like