Hinjawadi : मुंबई-पुणे बस प्रवासात लॅपटॉप चोरीला

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे या मार्गावर बसने प्रवास करत असताना चोरटयांनी प्रवाशाचा लॅपटॉप चोरून नेला. हा प्रकार 16 सप्टेंबर रोजी पनवेल ते भूमकर चौक या प्रवासादरम्यान घडला.

विश्वास देविदास दराडे (वय 36, रा. छत्रपती चौक, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दराडे पनवेल-वाकड या मार्गावर शिवशाही या बसने प्रवास करत होते. प्रवास करत असताना प्रवासात अज्ञात चोरटयाने त्यांचा डेल कंपनीचा 10 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. भूमकर चौक येथे उतरताना दराडे यांच्या लॅपटॉप चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी गुन्हा दाखल केला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.