-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi : शिवनेरी बसमध्ये लॅपटॉप चोरट्यांचा सुळसुळाट

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे या मार्गावर धावणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये लॅपटॉप चोरांचा सुळसुळाट झाला आहे. मागील दोन आठवड्यात शिवनेरी बसमधून प्रवाशांचे लॅपटॉप चोरून नेण्याच्या चार घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे शिवनेरी बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

24 डिसेंबर रोजी जयेंद्र जोशी हे दादर ते वाकड या मार्गावर शिवनेरी बसमधून प्रवास करीत होते. त्यांचा 25 हजारांचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेला. त्यानंतर दोन दिवसांनी लगेच सचिन तळावलीकर यांचा देखील 20 हजार रुपयांचा लॅपटॉप चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

5 जानेवारी रोजी करण चावला हे दादर ते पुणे या मार्गावरून प्रवास करत होते. ते दादर येथून शिवनेरी बसमध्ये बसले. वाकड येथे रात्री उतरले असता त्यांच्या सामानातून त्यांचेच लॅपटॉप, हेडफोन आणि दोन मनगटी घड्याळे गायब असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.

झैन झाहीद वारेकर (वय 27, रा. माहीम, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 7) अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. फिर्यादी झैन मंगळवारी दादर येथून पुण्याकडे शिवनेरी बसमधून येत होते. सायंकाळी सात वाजता ते बसमध्ये बसले. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास ते वाकड येथे उतरले असता त्यांचा बस प्रवासादरम्यान 60 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरी झाल्याचे उघडकीस आले.

दोन आठवड्यांच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शिवनेरी बसमधून प्रवास करणा-या प्रवाशांचे एक लाख 94 हजार रुपयांचे लॅपटॉप चोरून नेले आहेत. या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.