Maval : बजरंग दलाच्या वतीने किल्ले लोहगडावर भव्य दीपोत्सव 

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील किल्ले लोहगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा शिलेदार! दीपावली सर्वत्र अतिशय उत्साहात व आनंदात साजरी झाली. मात्र, शिवरायांचे गडकोट अंधारातच दीपावली उत्सवानिमित्त विश्व हिंदु परिषद बजरंग दलाच्या वतिने किल्ले लोहगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.

सुरुवातीला महादेवाच्या मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर गणेश दरवाज्याच्या परिसरात दीपोत्सव करण्यात आला. त्यानंतर गडावर सुरुवातीला पाय-यावर तसेच संपूर्ण गडपरिसरात दीपोत्सव करण्यात आला. मावळ तालुक्यातील शिवप्रेमी मोठ्या उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.संपूर्ण गडपरिसर लखलखत्या पणत्यानी उजळून निघाला होता. गडकोटांवर आता सन साजरे होत आहेत. आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून हे मावळे आता गडकोटांकडे पाहू लागले आहेत.

अनके संघटना या गडांवर आपले पारंपारिक सण साजरे करतात. या कार्यक्रमासाठी संयोजक, सचिन शेलार, महेंद्र असवले , महेश राक्षे, विकी शेटे, बाळा खांडभोर, सुशील वाडेकर, गडसंवर्धन प्रमुख सागर कटके, सहप्रमुख विकी शेटे, सुधीर दहिभाते, गणेश कुडे, शिवांकुर खैर, रुपेश, वाघमारे ,भारतीय मजूर संघाचे मावळ अध्यक्ष अशोक थोरात, विकी भांगरे, जयेश फाकटकर, मारुती देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी लोहगड, पवनमावळ, आंदरम‍ावळ, नाणेमावळ, तळेगाव, देहुरोड, लोणावळा कार्ला, तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी बजरंगदलाचे २०० कार्यकर्ते उपस्थित होते.

दीपोत्सवामुळे युवकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन गडकिल्ल्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योग्य दिशा मिळत असल्याची माहिती संदेश भेगडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.