Chinchwad News : एल्प्रो चौक ते भुमकर चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑईल गळती 

सजग नागरिकांमुळे अनेक अपघात टळले

एमपीसी न्यूज – एल्प्रो चौक ते भुमकर चौक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑईल गळती झाली आहे. यामुळे रास्ता निसरडा झाला होता व वाहन चालक घसरुन पडत होते. पिंपरी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर तात्काळ दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या रस्त्यावरील ऑईल धुवून काढण्याचे काम सुरू आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री ही ऑईल गळती झाली. चिंचवड मधील एल्प्रो कंपनीचा चौक ते डांगे चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे दिसून आले तर, तिथून पुढे भुमकर चौकापर्यंत तुरळक ठिकाणी ऑईल पडले होते. जवळपास तीन किलोमीटर मार्गावर जास्त ऑईल गळती झाली होती. रस्ता निसरडा झाल्यामुळे पहाटे काही दुचाकी चालक घसरुन पडले व किरकोळ जखमी झाले.
सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांच्या हि गोष्ट पहिल्यांदा निदर्शनास आली. तात्काळ पिंपरी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर दोन बंब ऑईल धुवून काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. साडे नऊपर्यंत ऑईल धुवून काढण्याचे काम अंतिम टप्प्यात आले होते. वाहतूक पोलीस कर्मचारी देखील घटना स्थळी दाखल झाले असून. वाहन चालकांना सावकाश गाडी चालवण्याची विनंती केली जात आहे.

 

दरम्यान, हि ऑईल नक्की कोणते आहे याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. अजूनही या रस्त्यावर वाहतूक मंद गतीने सुरू आहे. भुमकर चौकाकडे जाणा-या वाहन चालकांनी सावकाश वाहनं चालवावीत अथवा दुसऱ्या पर्यायी मार्गाचा अवलंब करावा

 सजग नागरिकांमुळे अनेक अपघात टळले 
सकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑईल गळती झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर परिसरात सजग नागरिकांनी ठिक- ठिकाणी दगड, झाडाच्या फांद्या व इतर बॅरिकेड्स लावले. वाहन चालकांना त्यांनी ऑईल गळती झाल्याची माहिती देत वाहन सावकाश चालवण्याची विनंती केली. यामुळे अनेक अपघात टळले. थेरगाव सोशल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली. ऑईल धुवून काढल्यानंतर देखील वाहनं स्लिप होत असल्याने अनेक स्वयंसेवक रस्त्याकडेला उभे राहून वाहन चालकांना सुचित करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.