Last Movie of Sushant Singh Rajput: सुशांतचा ‘दिल बेचारा’ लवकरच होणार प्रदर्शित

Last Movie of Sushant Singh Rajput: Sushant's 'Dil Bechara' to be released soon जाणून घ्या... 'दिल बेचारा' हा सुशांतचा शेवटचा चित्रपट कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

एमपीसी न्यूज – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये रसिकांच्या मनात घर केले होते. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. पण सुशांतने इतके टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेले नाही. सुशांतचा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणारा शेवटचा चित्रपट म्हणजे ‘दिल बेचारा’.  या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सुशांतचा शेवटाचा चित्रपट ‘दिल बेचारा’च्या प्रदर्शनाची तारीख ट्विटरद्वारे सांगितली आहे. ‘सुशांतसिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. डिझनी प्लस हॉटस्टारवर 24 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शन नसलेल्या प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे.

मुकेश छाब्रा दिग्दर्शित ‘दिल बेचारा’ या चित्रपटात सुशांत मुख्य भूमिकेत आहे. तसेच अभिनेत्री संजना सांघी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संजना या चित्रपटाच्या निमित्ताने कलाविश्वात पदार्पण करणार आहे. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे जुलै 2018 मध्ये चित्रीकरण सुरु झाले होते. तसेच हा चित्रपट जॉन ग्रीक यांच्या ‘द फॉल्ट इन आवर स्टार्स’ या पुस्तकावर आधारित आहे.

सुशांतच्या निधनानंतर सुशांतची शेवटी आठवण म्हणून त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच प्रदर्शित करावा अशी मागणी चाहत्याकडून केली जात होती. अनेकांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करु नका अशी मागणी केली होती. पण आता अखेर हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.