Last movie of Sushant – सुशांतसिंह राजपूतच्या ‘दिल बेचारा’ने रसिकांना केले भावुक

Sushant Singh Rajput's 'Dil Bechara' made the audience passionate

एमपीसी न्यूज – लहानवयातच लोकप्रियता मिळालेला आणि आत्महत्या करुन अकाली हे जग सोडून गेलेला अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट‘दिल बेचारा’ हा 24  जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावुक झाले आहेत.

अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. यामध्येच अंकिता लोखंडेच्या अश्रूंचा बांधदेखील फुटला असून तिने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

हा चित्रपट पाहताना सुशांत आपल्यात नसल्याची जाणीव चाहत्यांना आणि सुशांतच्या कुटुंबीयांना सतत होत असल्यामुळे ते भावुक झाले आहेत. यावर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने मोजक्या शब्दांत सुशांतबद्दलची प्रीतीची भावना, प्रेम, त्याच्या आठवणीने व्याकुळ झालेली तळमळ व्यक्त केली आहे.

‘पवित्र रिश्तापासून दिल बेचारा तक. एक आखिरी बार..’, असं म्हणत अंकिताने दिल बेचारामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत तिचं सांत्वन केलं आहे.

विशेष म्हणजे चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रेण्ड होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील दिल बेचाराने विक्रम केल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग मिळालं आहे.

लॉकडाउन असल्यामुळे ‘दिल बेचारा’ हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात सुशांत सिंहसोबत नवोदित अभिनेत्री संजना सांघीने स्क्रीन शेअर केली असून तिचा अभिनयदेखील प्रेक्षकांना भावला आहे.

‘दिल बेचारा’ प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर तो प्रचंड ट्रेण्ड होत आहे. यामध्येच चित्रपट व्यापार विश्लेषकांकडूनदेखील या चित्रपटांला चांगले रेटिंग मिळत आहे. 1 तास 41  मिनीटांच्या या चित्रपटाला जगातील सर्वात मोठी रेटिंग ऑथिरिटी आयएमडीबीनेदेखील 10 पैकी 10  रेटिंग दिलं आहे. हे रेटिंग 1048 या रेटिंगवर आधारित आहे.

आयएमडीबीचा फुलफॉर्म आहे इंटरनेट मुव्ही डेटाबेस. जसं नावावरुनच स्पष्ट होतं आहे, त्याप्रमाणे आयएमडीबी हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यावर चित्रपट पाहणारे चाहते एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात.

येथे स्टार्स पद्धतीवर कोणत्याही कलाकृतीला रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग समजलं जातं. या प्लॅटफॉर्मवर चित्रपट, मालिका, बेस सिरीज, व्हिडिओ गेम्स अशा सर्वच गोष्टींना रेटिंग देता येतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.