Last Year Exam : अंतिम वर्षाच्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बॅकलॉग आणि अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.

विद्यापीठाकडून 12 ते 31 ऑक्टोबर दरम्यान ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यात बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरुपाची प्रश्नपत्रिका असेल. या परीक्षेचे स्वरुप विद्यार्थ्यांना कळण्यासाठी 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान सराव चाचण्यांची सुविधा देण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.

त्यानुसार प्रत्येक विषयाचे स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यापीठाने विषयनिहाय वेळापत्रक प्रसिद्ध केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोणत्या विषयाची ऑनलाइन आणि ऑफलाइन परीक्षा कोणत्या दिवशी आहे, त्याची माहिती देण्यात आली आहे.

असे पहा परिक्षेचे वेळापत्रक

पुणे विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाऊन परीक्षा विभागाच्या पोर्टलवर ‘शेड्युल अ‍ॅण्ड टाइम टेबल’ यावर क्लिक करावे. त्यानंतर सर्वात शेवटी “टाइम टेबल्स’वर क्लिक केल्यानंतर विद्या शाखानिहाय वेळापत्रक उपलब्ध होईल. त्यात विषयनिहाय परीक्षेचे वेळापत्रक उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.