Pune : गत वर्षांचे महाराष्ट्र केसरी ‘किताब’च्या शर्यतीतून बाहेर; उद्या मिळणार नवीन महाराष्ट्र केसरी

मागील वर्षीचा महाराष्ट्र केसरी अभिजित कटकर याला नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने दाखविले अस्मान...

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील उपांत्य फेरी तुल्यबळ, अतीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणांनी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या ४ सेकंदातही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत ‘काटे की टक्कर’ देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली. शैलेशने ज्ञानेश्वरवर ११-१० अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व किताबाच्या दावेदार शर्यतीत जागा निश्चित केली. अशीच लढत करत नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत काटकेला ५-२ गुणांनी पराजित केले. तोडीसतोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला.

_MPC_DIR_MPU_II

उपांत्य फेर्यांमधील थरार

२०१८ चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखला चितपट करत ज्ञानेश्वर जमदाडेची घोडदौड

महाराष्ट्र केसरी खुला गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरसीची लढत झाली. अपेक्षेप्रमाणे बाला रफिकने लीड घेतली होती. पण त्याला तोडीस तोड टक्कर देत माऊलीने एका मिनिटाच्या आत त्याला चितपट करून बाजी मारली व माती विभागातील अंतिम सामन्यात प्रवेश केला. तसेच लातूरच्या शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगतापवर ६-४ गुण फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पुणे शहराचा अभिजीत कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी चित्त थरारक तुल्यबळ लढत झाली. यात अभिजीतने सागरवर २-० गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नाशिक जिल्हयाच्या हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवार ६-० ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1