Pimpri : दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

एमपीसी न्यूज – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या 88 व्या जयंती निमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. त्याचप्रमाणे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मनपा भवनातील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास मुख्य लेखापरीक्षक अमोद कुंभोजकर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, आदी उपस्थित ठोते.

चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘वाचन स्पर्धा’ आयोजित करण्यात आल्या .यावेळी प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या उपप्रचार्या प्रा. डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या हस्ते डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेस सुरुवात झाली.या प्रसंगी भाषा विभागाचे सर्व प्राध्यापक, अभ्यासेत्तर उपक्रम समितीचे प्राध्यापक सदस्य तसेच कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या तिन्ही समन्वयक उपस्थित होते.

कर्तव्य फाउंडेशनतर्फे कँम्प भागातील सेंट जाँन हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी सिंधू महासभेचे जितेंद्र अडवाणी, डॉ. बंटी धर्मा, सी.ए.अरविंद खंडेलवाल, नंदूशेठ नायकू, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, अशोक देशमुख, गणेश शेलार, दिलीप भिकुले, मुख्याध्यापिका नूतन जाधव, मन्सूर शेख, हसन रंगरेज, मोहसीन शेख,कमलेश गोडसे, सुनील बाथम, राहूल भोसले आदी उपस्थित होते.

पुण्यात आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त पुस्तकांचे आदान प्रदान उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपले आवडते पुस्तक घेऊन या पुस्तक मेळ्यामध्ये यावे, दुसरे आवडते पुस्तक वाचावे असा हा आदान प्रदान उपक्रम सकाळी साडेनऊ वाजता आयोजित आला. ‘भिलार’ या पुस्तकांच्या गावाचा माहितीपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी डॉ कलाम यांची वचने असलेली इ -पोस्टर्स तयार केली. प्राचार्य डॉ शैला बुटवाला, अनिसा खान यांनी स्वागत केले.

भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी व सोहम सार्वजनिक ग्रंथालय, संत तुकाराम नगर,पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने *’वाचन प्रेरणा दिन’* संत तुकाराम नगर येथे साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सोहम ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्षजगन्नाथ नेरकर यांनी प्रस्ताविक केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीमती श्रेया गोखले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश भुकेले उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.