Pimpri : स्वर्गीय अण्णासाहेब पाटील पुतळा सुशोभीकरणासाठी 50 लाखांचा खर्च

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यामध्ये बाधित होत असल्याने स्थलांतर

एमपीसी न्यूज –  रस्ता रुंदीकरणात बाधित होणारा के. एस. बी. चौकातील स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा हलविण्यात येणार आहे. राजर्षि शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोरील जागेत हा पुतळा स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थापत्य बीआरटीएस विभागातर्फे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा विकास आरखड्यातील रस्ता बीआरटीएस कॉरीडॉर जेएनएनयुआरएम अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये केएसबी चौक, चिंचवड येथे माथाडी कामगारांचे नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा आहे. हा पुतळा रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होत असल्यामुळे तेथून हलविण्यात येणार आहे. हा पुतळा तेथून हलवून राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोरील ट्राफीक आयलँडमधील जागेत रुथलांतरीत करण्यात येणार आहे. त्याच्या प्रस्तावाला सर्वांची सहमती मिळाली आहे. पुतळा स्थलांतरीत झाल्यानंतर त्या ठिकाणचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

या कामाचा सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात समावेश असून त्यासाठी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या पुतळा परिसराच्या सुशोभिकरणाचे काम आवश्यक असून या पुतळ्याच्या परिसराचे नियोजन करून आराखडे तयार करणे, सुशोभिकरण बाबींचे दरपृथ्थकरण करणे, त्यानुसार पूर्वगणक पत्रकर करणे, निविदा बनविणे आणि निविदा पश्चात कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी अशा प्रकारच्या कामांचा अनुभव असणारे आणि महापालिकेच्या आर्किटेक्ट पॅनलवर असलेले आर्किटेक्ट मेसर्स शिल्पी आर्किटेक्ट अँड प्लॅनर्स यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार 2 टक्के प्रमाणे फि स्वरूपात एकूण निविदा रक्कम अदा करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.