Bhandara Dongar : कामगार नेते कै. दत्ताशेठ गायकवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भंडारा डोंगर ट्रस्टला एक लाख 11 हजारांची देणगी

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील कामगार नेते कै. दत्ताशेठ गायकवाड यांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त मावळ तालुका दिंडी समाज अध्यक्ष तुकाराम गायकवाड व टाकवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड परिवाराकडून श्री विठ्ठल रखुमाई, तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट (Bhandara Dongar Trust)   यांना 1 लाख  11 हजार 111 रूपयांची देणगी देण्यात आली. ही देणगी उद्योजक शंकरराव शेळके यांच्या हस्ते भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष साहेबराव तथा बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 

गायकवाड परिवाराने वारकऱ्यांची सेवा करत मावळ तालुका दिंडी पंढरपूर यात्रेसाठी टेम्पो व्यवस्था केली. तसेच पालखी सोहळ्यादरम्यान पावसाचे वातावरण असल्याने वारक-यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.

 

 

यावेळी कीर्तनकार ह.भ.प. विश्वनाथ महाराज केंद्रे,  ह.भ.प. रोहिदास महाराज धनवे, मावळ तालुका दिंडी समाज माजी अध्यक्ष नरहरी केदारी, पोटोबामहाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त तुकारामबुवा ढोरे, महादुबुवा सातकर, विकास महाराज खांडभोर, ह.भ.प. दिलीप महाराज खेंगरे, गणेश महाराज जांभळे, पांडुरंग महाराज गायकवाड, बाबाजी महाराज काटकर, माजी सरपंच तुकाराम असवले, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, संघटनमंत्री नारायण ठाकर, लक्ष्मण बालगुडे, काळूराम मालपोटे, माजी सभापती राजाराम शिंदे, टाकवे ग्रामपंचायतीचे सरपंच भुषण असवले, माऊली जांभुळकर,पांडुरंग लालगुडे, गणेश काजळे,नगरसेवक सुनिल ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष किशोर सातकर, मारूती शेलार, गोविंद आंभोरे, विलास मालपोटे, संभाजी टेमगिरे,नामदेव शेलार,निवृत्ती जाधव, बबन शेवाळे,प्रल्हाद जांभुळकर, नंदु असवले, दत्तात्रय असवले,बबन कोंडे, सदानंद पिलाणे, ऋषीनाथ शिंदे, परशुराम मालपोटे, देवराम असवले, चंद्रकांत वाघमारे, योगेश मोढवेसह समस्त ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.