Pimpri : दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध कार्यक्रम

पर्यावरण प्रेमी हिरामण भुजबळ यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार

एमपीसी न्यूज – दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे-पाटील यांच्या 37 व्या स्मृतीदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार, रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर, जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा असे विविध कार्यक्रम मंगळवार (दि.6) आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रम पिंपरी (Pimpri) वाघेरे येथील नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे होणार आहेत, अशी माहिती दिवंगत भिकू वाघेरे पाटील प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Pimpri : करोडो रुपयांचा खर्च करूनही शहरात रस्त्यावर तुंबई कशी होतेय? –  नाना काटे

प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब वाघेरे, किसन वाघेरे, रमेश कुदळे, शेखर कुदळे, रामदास कुदळे, अण्णा कापसे, जयवंतराव शिंदे, अनवर शेख, विजू थॉमस, गणेश गोंडे, योगेश पंडाळकर आदी उपस्थित होते.

माजी महापौर उषा ढोरे, आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी नऊ वाजता पिंपरी वाघेरे येथील दिवंगत महापौर कै. भिकु वाघेरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप शिबिर सकाळी दहाला होणार आहे.

पर्यावरणप्रेमी हिरामण भुजबळ यांना पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार आण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व विविध पक्षाचे पदाधिकारी व माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या मान्यतेने सकाळी सहाला नवमहाराष्ट्र विद्यालय मैदान येथे जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत 10, 12, 14, 18 वर्षांखालील मुले व मुली, महिला व पुरूष खुला गट, 50 वर्षांखालील महिला व पुरूष, 50 वर्षांवरील ज्येष्ठ महिला व पुरूष असे 14 गट आहेत. विजेत्यांना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र बक्षीस आहे. नाव नोंदणीसाठी स्पर्धकांनी 1 ते 5 जून या कालावधीत नवमहाराष्ट्र विद्यालयामागील माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा. प्

रवेश अर्जासोबत आधार कार्डची झेराक्स प्रत आवश्यक आहे. स्पर्धाच्या अधिक माहितीसाठी 9822000304 किंवा 9011093694, रामदास कुदळे 9822406349, रमेश कुदळे 9850491253 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.