Pune News : पुणे मनपाच्या नवीन इमारतीत जाणवतेय कमालीची शांतता

एमपीसी न्यूज – एरवी कमालीची वर्दळ असलेल्या पुणे महापालिकेच्या नवीन इमारतीत सध्या कमालीची शांतता जाणवत आहे. पुणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू झाली आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यालय कुलूपबंद करण्यात आले, त्यामुळेच ही शांतता पाहायला मिळत आहे.

भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे, आरपीआय (आठवले गट), एमआयएम या सर्वच राजकीय कार्यालयाला कुलूप लावण्यात आले आहेत. सध्या प्रशासकीय कारभार सुरू आहे. पुणे मनपा निवडणूक कधी होणार, असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात येत आहे.

3 चा प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याची चर्चा होती. त्या पद्धतीने प्रभाग रचना करण्यात आली. मात्र, ओबीसी आरक्षण आणि कोरोना महामारीमुळे निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची कुजबुज आहे. सर्व नगरसेवक माजी झाल्याने आता निवडणुकीशिवाय पर्याय नाही.

नवीन इमारतीत शांतता असली तरी, जुन्या इमारतीत मात्र वर्दळ जाणवते आहे. दरम्यान, यानिमित्ताने पालिकेचा एक अंतर्गत प्रश्न पुढे आला आहे. नवीन इमारतीत पिण्याच्या पाण्याची अजूनही व्यवस्था नाही. पाणी कुठे प्यावे, असा सवाल त्यामुळे उपस्थित करण्यात येत असून हा प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.