Latur News : शिवा संघटनेचा 27 वा वर्धापन दिन लातूर येथे जल्लोषात संपन्न

एमपीसी न्यूज- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा 27 वा वर्धापन दिन लातूर शहरात बिडवे लॉन्स येथे हजारो कार्यकत्यांच्या उपस्थितीत प्रचंड जल्लोषात साजरा (Latur News) झाला. यावेळी उद्घाटनपर भाषणात शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी शिवा संघटना ‘जैसे थे’ ठेवून इतर अनेक समाजातील ओबीसी, बहुजन, आदिवासी, दिनदलित, शेतकरी, कष्टकरी व उपेक्षित घटकांना व विविध सामाजिक संघटनांना सोबत घेवून शिवा जनशक्ती पक्षाची घोषणा करत असल्याचे सांगीतले.

शिवा संघटनेच्या वतीने 27 वा वर्धापन दिन व भव्य राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन 28 जानेवारी रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आले होते. हा वर्धापन दिन सोहळा सुरुवात होण्याअगोदर लातूर शहरातून प्रचंड मोठी वाहन रॅली काढण्यात (Latur News) आली होती.

हा सोहळा हजारो कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने एका मोठ्या जल्लोषात संपन्न होत असतांनाच दुग्धशर्करा योग म्हणजे ओबीसी नेते तथा शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी विविध जातीधर्मातील लोकांना व विविध ओबीसी संघटनांना सोबत घेवून एका नव्या राजकीय पक्षाची ‘शिवा जनशक्ती पक्षाची’ अधिकृत घोषणा केली तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष करून घोषणाबाजी केली.

स्वातंत्र्योत्तर 75 वर्षाच्या काळात आम्ही ओबीसी, बहुजनांनी प्रस्थापित राजकीय पक्षांमध्ये निष्ठेने काम करुनही समाजाच्या पदरात उपेक्षाच पडली, त्या पक्षांनी निवडणुकांपुरता उपयोग करून घेवून बहुजनांना सत्तेपासून दुरच ठेवले. त्यामुळे बहुजन समाजामध्ये प्रचंड रोष आहे.

Pimpri News : पोलिसांची अशीही तत्परता, गाडीवरून पत्ता शोधून काढून वयस्कर इसमाला घरी सुखरूप पोहचवले

प्रस्थापित पक्षातील लोकांनी वाममार्गांनी प्रचंड भ्रष्टाचार करुन उलट्या होईपर्यंत खाल्ले आणि एकमेकांचे उणे दुणे काढत ईडी, सीबीआयच्या चौकशांच्या नावावर या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणे (Latur News) आणि सामान्य बहुजनांच्या प्रश्नांना बगल देण्याचेच काम केले आहे. या सर्व किळसवाण्या राजकारणाला सामान्य जनता कंटाळली असून स्वच्छ प्रतिमेचे, इमानदार व ओबीसी बहुजनांना सत्तेचा वाटा मिळवून देईल अशा एका राजकीय पक्षाची गरज होती.

तशी शिवा संघटनेसह वेगवेगळ्या सामाजिक संघटनांकडून मोठ्या प्रमाणावर अग्रही मागणी होत असल्यामुळेच वैयक्तिक प्रा. मनोहर धोंडे यांची इच्छा असेल किंवा नसेल तरीही कार्यकर्त्यांचा भावनेचा आदर करत ‘शिवा जनशक्ती पार्टी या नवीन राजकीय पक्षाची स्थापना झाल्याची घोषणा प्रा. मनोहर धोंडे यांनी केली आहे. त्यास कार्यकर्त्यांकडून प्रचंड उत्फुर्त प्रतिसाद मिळाला असून सामान्यांचे व्यासपीठ म्हणून या पक्षाचे भविष्यातील कार्य चालू राहणार असल्याचे सांगीतले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या उत्तराधिकाऱ्याचे पालनकर्ते गुरुराज स्वामी अहमदपूरकर तर उद्घाटक म्हणून शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहरराव धोंडे हे आचार्य होते.

प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य शंकरलिंग शिवाचार्य महाराज शिरुर अनंतपाळकर, गुरुवर्य येरटे महाराज निलंगेकर, लातुरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आमदार बाबुराव खंदाडे, शिवा संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत अप्पा शेटे (पुणे), राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. वाय. बी. सोनटक्के (मुंबई), भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणा होणराव, राज्य उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे (नांदेड), राज्य उपाध्यक्ष सुनिल वाडकर (नाशिक), राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर (परभणी), राज्य सरचिटणीस रुपेश होनराव (मुंबई), राज्य सरचिटणीस विठ्ठल ताकबीडे (नांदेड), सोशल मिडीया महाराष्ट्र अध्यक्ष मनिष पंधाडे, राज्य मुख्य संघटक नारायण ककनवाडी, राज्य चिटणीस सातलिंग स्वामी,

राज्य चिटणीस प्रा. किशन अप्पा इमडे, मराठवाडा अध्यक्ष संजय कोठाळे (नांदेड), प.म.अध्यक्ष अरविंद पा. भडोळे (सोलापूर), पश्चिम महाराष्ट्र चिटणीस श्रावण जंगम, स्वागताध्यक्ष दत्ता खंकरे, लातूर भाजपा शहराध्यक्ष गुरुनाथअप्पा मगे, उदगीर येथील विरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांतअप्पा वैजापुरे, औसाचे विरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष अप्पा मुक्ता, भारतीय जनता युवा मोर्चाचे अमोल निडवदे, शिवा संघटना आळंदी शहर उपाध्यक्ष सोमनाथ साखरे, कार्याध्यक्ष नानासाहेब मोरे यांच्यासह अनेक शिवकिर्तनकार, सर्व जिल्हाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्काराने सन्मानित प्रा.सोमनाथ किडीले व त्यांच्या संचाने स्वागत गिताने व इतर शिवा संघटनेच्या गिताने सभागृह दुमदुमुन टाकले. तसेच शिवा कर्मचारी महासंघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा शि.भ.प.शिवशरण रटकलकर गुरुजी यांनी शिवा संघटनेवर प्रचंड मोठ्या जल्लोषात गायन करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

स्वागताध्यक्ष दत्ता खंकरे यांनी प्रास्ताविक करून शिवा संघटने संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे हे महाराष्ट्रासह इतर सहा राज्यात वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने धडपडत असतात, म्हणूनच आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करतो.

यावेळी उमाकांतअप्पा शेट्टे, खा.सुधाकर श्रृंगारे, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी आ.बब्रुबान खंदाडे, प्रेरणा होणराव, गुरुनाथअप्पा मगे यांनी शिवा संघटनेच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रा.मनोहर धोंडे यांच्या समाज कार्याचा व गौरव केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रुपेश होनराव यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.याबाबत माहिती शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे आळंदी शहर अध्यक्ष सदाशिव साखरे (Latur News) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.