PMRDA : पीएमआरडीएच्या गृहयोजना ई-नोंदणी केंद्राचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने विकसित केलेल्या पेठ क्रमांक 12 मधील गृहयोजना नोंदणीसाठी ई-नोंदणी केंद्राच शुभारंभ आयुक्त राहुल महिवाल यांचे हस्ते नुकताच झाला.

अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला, अतिरिक्त नोंदणी महानिरीक्षक नंदकुमार काटकर, पीएमारडीएचे सह आयुक्त बन्सी गवळी, नोंदणी उप महानिरीक्षक दीपक सोनवणे, अजय जोशी, संजय कोतकर, जितेंद्र जोशी, उप जिल्हाधिकारी तथा जन संपर्क अधिकारी रामदास जगताप, उप जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर तसेच पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वसईकर उपस्थित होते.

Pune News : लौकिक एफ.ए., संगम यंग बॉईज आमदार चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

या गृहयोजनेत सुमारे 4 हजार 800 घरकुले बांधण्यात आली असून सुमारे 4 हजार सदनिकांचे (PMRDA) वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात आले. या सर्व सदनिकांच्या दस्त नोंदणीसाठी प्राधिकरणाच्या वतीने हे ई-नोंदणी केंद्र नोंदणी महानिरीक्षक यांचे सहकार्याने सुरु केले आहे. ई-रजिस्ट्रेशन ची प्रणाली एनआयसी पुणे यांनी विकसित केलेली असून त्यामुळे दररोज सुमारे 100 ते 150 सदनिकांची नोंदणी करणे शक्य होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.