Vadgaon Maval News : वडगाव मावळ ते कात्रज या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ 

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील विद्यार्थी, कामगार व प्रवासी नागरिकांकरिता पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत(पीएमपीएमएल) आजपासून सुरू करण्यात आलेल्या वडगाव मावळ ते कात्रज या नवीन मार्गावरील बससेवेचा शुभारंभ करून वडगाव फाट्यापर्यंत तिकीट काढून पदाधिकाऱ्यांसह प्रवास केला.

यावेळी जिल्हापरिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, पीएमपीएमएलचे निगडी डेपो आगार व्यवस्थापक शांताराम वाघेरे, बालेवाडी आगार व्यवस्थापक माळी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाषराव जाधव, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, नारायण ठाकर, सुनिल ढोरे, पंढरीनाथ ढोरे, चंद्रजीत वाघमारे, कैलास गायकवाड, दत्तात्रय पडवळ आदी उपस्थित होते.

तालुक्यातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार शेळके यांनी पीएमपीएमएलकडे अनेकदा पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रवाशांच्या सोयीसाठी कात्रज-वडगाव मावळ मार्गावर बससेवा सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय पीएमपीएमएलने घेतला आहे. या नवीन बसमार्गामुळे सार्वजनिक वाहतूक सक्षम होण्यास मदत होईल व याचा फायदा नागरिकांना नक्की होईल असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

असा असेल बसचा मार्ग आणि वेळ

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.