TVS Jupiter : नवी टीव्हीएस ज्युपिटर लाँच करत ‘फास्टेस्ट फाइव्ह मिलियन व्हिइकल्स ऑन रोड’चा विक्रमी टप्पा पार

एमपीसी न्यूज – टीव्हीएस मोटर (TVS Jupiter) कंपनी या दुचाकी व तीनचाकी क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या कंपनीने नवी टीव्हीएस ज्युपिटर क्लासिक लाँच करत असल्याचे जाहीर केले आहे. ही टीव्हीएस ज्युपिटर सेलिब्रेटी एडिशन असून ‘फास्टेस्ट फाईव्ह मिलियन ऑन रोड’चा विक्रमी टप्पा साजरा करण्यासाठी ही लाँच केली जात आहे.

नव्या टीव्हीएस ज्युपिटर क्लासिकला काळ्या रंगाच्या थीमसह प्रीमियम लूक देण्यात आला असून तो आरसे, हायलाइट्स, फेंडर गार्निश, टिंटेड व्हायरस आणि थ्रीडी प्रीमियम लोगोमध्ये ठळकपणे समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हँडलबार संपतो तिथे डायमंड कट अलाँय व्हील्स, रिच डार्क ब्राउन इनर पॅनेल्स देण्यात आले आहे. थीमला सुसंगत राहाण्यासाठी बॅक रेस्टसह दर्जेदार लेदर सीट्सचा समावेश करण्यात आला आहे.

डिकॅल्स, डायल आर्टला ज्युपिटरचा क्लासिक लूक देण्यात आला आहे. या व्हेरियंटमध्ये मिस्टीक ग्रे आणि रिगल पर्पल असे दोन खास रंग उपलब्ध करण्यात आले आहेत. टीव्हीएस ज्युपिटर क्लासमध्ये प्रीमियम क्लासिक थीम नव्या स्वरुपात मांडण्यात आली आहे. ‘ज्यादा का फायदा’ या तत्वाला अनुसरून या व्हेरियंट मध्ये डिस्क ब्रेक व इंजिन किल स्विचस जास्त सुरक्षा तसेच ऑल इन वन लॉक, युएसबी चार्जर, पिलियन बॅकरेस्टसह जास्त सोयीस्करपणा देण्यात आला असल्यामुळे गाडी स्टाइल आणि वैशिष्ट्ये अशा दोन्ही बाबतीत परिपूर्ण आहे.

Vedanta-Foxconn Company : वेदांता- फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातच रहावी यासाठी थेट राष्ट्रपतींकडे मागणी

टिव्हीएस मोटर कंपनीच्या कॉर्पोरेट ब्रँड (TVS Jupiter) आणि डीलर ट्रान्सफॉर्मेशन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिरूद्ध हलदार म्हणाले की, ‘या व्हेरियंटच्या माध्यमातून टीव्हीएस ज्युपिटर ‘फास्टेस्ट फाइव्ह मिलियन व्हिइकल्स ऑन रोड’चा विक्रमी टप्पा साजरा करत आहे. लाखो ग्राहकांनी टीव्हीएस ज्युपिटरवर दाखवलेला गाढ विश्वास आणि प्रेम यामुळे हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.टीव्हीएस ज्युपिटर क्लासिकसह आम्ही नव्याने टीव्हीएस ज्युपिटर ब्रँडचे ‘ज्यादा का फायदा’ हे आश्वासन देखील देत आहोत.

टीव्हीएस ज्युपिटर क्लासिकला अत्याधुनिक, अल्युमिनियम, कमी घर्षण करणारे 110 सीसी इंजिन बसवण्यात आले आहे, जे ताकद, अधिक चांगले अक्सलरेशन, सर्वोत्तम इंधन क्षमता यांचा मेळ घालणार आहे. मेटल पासून बनवलेली टीव्हीएस ज्युपिटर क्लासिक रस्त्यावर उठून दिसेल, शिवाय तिची दमदार कामगिरी, रायडिंग चा उच्च दर्जा, आरामदायीपणा यांमुळे ती योग्य जोडीदार ठरते. या स्कूटरमध्ये टीव्हीएसचे पेटंट असलेले इकोनॉमीटर देण्यात आले आहे, जे रायडरला इको मोड आणि पॉवर मोड अशा दोन्ही मोडमध्ये मार्गदर्शन करते. इंजिनची सर्वोत्तम इंधन क्षमता इको मोडमध्ये अनुभवता येऊ शकते. डिस्क ब्रेकसह टीव्हीएस ज्युपिटर क्लासिक ची किंमत रू. 85 हजार 866 रुपये (एक्स शोरूम दिल्ली) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.