Pimpri News: ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’ला सुरुवात, 5 हजार व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची तपासणी

Launch of 'SARS Covey - 2 Survey', testing of blood samples of 5000 persons ; पथकाला सहकार्य करण्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज –  डॉ. डी. वाय. पाटील मेडीकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून आणि पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या मतदीने अ‍ॅण्टीबॉडीज चाचणी म्हणजेच ‘सार्स कोवी – 2 सर्वेक्षण’ शहरात चालू झाला आहे. आठ दिवसांपासून त्याचे काम सुरु झाले आहे. 5 हजार व्यक्तींच्या रक्त नमुन्यांची शास्त्रीय तपासणी होणार आहे. ज्यांच्याकडे हा सर्व्हे होईल. त्या नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.  

आयुक्त हर्डीकर म्हणाले, किती लोकांना कोरोनाची लागण झाली आणि किती लोकांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली, याची माहिती घेण्यासाठी हा सर्वे आहे. त्याचे काम शहरात सुरु झाले आहे.

या पथकाला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे. ते काही प्रश्न भरुन घेतील. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आर्थिक प्रश्न विचारले जाणार नाहीत. केवळ वैद्यकीय बाबतीत प्रश्न विचारणार आहेत.

रक्ताचे नमुने घेणार आहेत. स्वॅब घेतला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे हा सर्व्हे होईल त्या नागरिकांनी सहकार्य करावे.

पाच हजार सॅम्पल सर्वे आहे. मोठा सर्वे आहे. आठवड्याभरापूर्वी सर्वे सुरु झाला आहे. त्याला महिना ते दीड महिना लागेल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

कोरोना विरोधाच्या लढ्यात सार्स कोवी – 2 सर्वेक्षण हे एक महत्वाचं अस्त्र ठरणार आहे. कोरोनाचे संकट नेमके कुठवर फैलावले आहे याची माहिती याद्वारे मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.