Technology News : नवी ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज-11 लाँच, पाहा काय आहेत वैशिष्ट्य

एमपीसी न्यूज : मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपली नवी ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज-11 लाँच केली आहे. यात अनेक नवे फिचर देण्यात आले आहेत. तसेच नवी थीम आणि ग्राफिक्सही अपडेट केलेले आहे.

मायक्रोसॉफ्टने ब्लॉगद्वारे दिलेल्या माहितीनुसार विंडोज-11 या वर्षअखेरीस ऑपरेटिंग कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट्स या डिव्हाईसवर इन्स्टॉल केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे विंडोज-10प्रमाणे हेदखील प्री अपग्रेडसह उपलब्ध केले जाईल. विंडोज-11 रोलआऊट झाल्यानंतर डेल, एचपी, असूस, लेनोक्होच्या डिक्हाईसकर उपलब्ध होईल.

विंडोज-11 पूर्णपणे रिडिझाईन करण्यात आले आहे. यात बूट स्क्रीनपासून इंटरफेस आयकॉन्सपर्यंत बदल दिसतील. स्टार्ट मेन्यू सेंटरला देण्यात आले आहे, तर युजर्सकडून मोठय़ा प्रमाणात वापरले जाणारे ऍप्स एका क्लिकवर स्क्रोल करण्यात येणार आहेत.

टास्क बार सेंटरला अलाईन करण्यात आले आहे. हे ऑपरेटिंग सिस्टीम टच फ्रेंडली आहे. त्याला टॅबलेट्स आणि टच स्क्रीन पीसीच्या दृष्टीने डिझाईन केले आहे. तसेच यात डार्क आणि लाईट मोड असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.