Pune : गतविजेत्या एमपी अकॅडमीची थाटात सुरुवात; स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर पडला गोलांचा पाऊस!

एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी (19 वर्षांखालील)

एमपीसी न्यूज – “एसएनबीपी’ अखिल भारतीय 19 वर्षांखालील हॉकी स्पर्धेत गेली दोन वर्षे विजेते असणाऱ्या एमपी हॉकी ऍकॅडमीने थाटात सुरवात केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी त्यांनी भिलवाडा हॉकी ऍकॅडमीचा 17-0 असा धुव्वा उडविला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज मैदानावर पडलेला गोलांचा पाऊस वैशिष्ट्यपूर्ण ठरला. दिवसभरातील सामन्यातून तब्बल 51 गोल नोंदविले गेले.

महंमद झैद खान याने पाच गोल नोंदवताना एमपी संघाच्या विजयाता मोलाचा वाटा उचलला. त्याने 11, 21, 21, 40 आणि 54व्या मिनिटाला गोल केला. त्याला अली अहमद याने चार गोल करत सुरेख साथ दिली. विकी पांड्या याने दोन, तर प्रियोबात्रा तेलेम, इंगालेम्बा थौउनाओजाम, श्रेयस धुपे, लोवे कानोजिया, सुंदरम राजावत, आशिष लाल यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.

“ड’ गटात झालेल्या सामन्यात सेल हॉकी ऍकॅडमी संघाने चंद्रपूर हॉकी शिंदेवाही संघावर 18-0 अशी मात केली. मुकेश टेटे, अमोल एक्का यांनी प्रत्येकी तीन गोल केले. प्रशांत, नितिश, प्रीतम एक्का, चंद्रमोहन यांनी प्रत्येकी दोन, तर केरोबिन लाक्रा, तरुण यादव, राजकुमार मिंझ आणि विष्णू यादव यांनी प्रत्येकी एक गोल केला.

यजमान एसएनबीपी प्रशाला संघाला एसजीपीसी अमृतसर संघाकडून 0-21 असा दारुण पराभवाचा सामना करावा लागला. “ग’ गटातील या सामन्यात नोंद झालेले गोल हे या स्पर्धेतील सर्वाधिक ठरले. स्पर्धेतील कठिण मानला जाणाऱ्या “फ’ गटात सालुते हॉकी ऍकॅडमी संघाने नागूपर संघाचा 3-2 असा पराभव केला. नंदकिशोर यादवने 24, नितिनने 35 आणि दीपक कुमारने 50व्या मिनिटाला गोल केला. पराबूत संगाकडून कर्णधार प्रिन्स कुमारने 36 आणि हरमनदीप सिंग याने 55व्या मिनिटाला गोल केले. भिलवाडा हॉकी ऍकॅडमी आणि नागपूर हॉकी ऍकॅडमी संघांचे अनुक्रमे अ आणि फ गटातून आव्हान संपुष्टात आले.

निकाल
अ गट  एमपी हॉकी ऍकॅडमी 17 (प्रियोबात्रा 10वे, मंहम झैद खान 11, 21, 31, 40, 54वे, इंगलेम्बा थोऊनाओजाम 15वे, श्रेयस धुपे 17, विकी पांड्या 18, 49वे, अली अहमद 22, 46, 47, 50वे, लोव कनोजिया 25वे, सुंदरम राजावत 30वे, आशिष लाल 60वे मिनिट) वि. भिलवाडा हॉकी ऍकॅडमी 0. मध्यंतर 9-0

ड गट – हॉकी ऍकॅडमी 18 (प्रशांत 2, 30वे, केरोबिन लाक्रा 5वे, मुकेश टेटे 6, 14, 35, नितेश 7, 27,वे, तरुम यादव 11, प्रितम एक्का 20, 55वे, चंद्रमोहन 21, 53वे, अनमोल एक्का 30, 33, 47वे, राजकुमार मिंझ 45वे, विष्णू यादव 58वे मिनिट) वि.वि. हॉकी शिंदेवाही 0. मध्यंतर 11-0

ग गट – एसजीपीसी अमृतसर 21 (विक्रमजित सिंग 2, 9, 10, 39वे, सरबजिंदर सिंग 7, 16वे, अमृतपाल सिंग 12, 18, 25, 51, 57वे, सहजप्रीत सिंग 22वे, जगप्रीत सिंग 26, 24, 40, 44वे, हर्षदीप सिंग 35, कंवलजीत सिंग 42, हरप्रीत सिंग 49, 53 आणि 54वे मिनिट) वि.वि. एसएनबीपी स्कूल 0. मध्यंतर 16-0

फ गट – सॅल्युट हॉकी ऐनवेळी माघार
सलग चौथ्या वर्षी 19 वर्षांखालील एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या संयोजकांना तीन प्रमुख संघांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे धक्का बसला आहे. गेल्यावर्षीचा उपविजेता स्थानिक क्रीडा प्रबोधिनी संघाने अगदी ऐनवेळी ाघार घेतली. त्याचबरोबर आर्मी बॉईज स्पोर्टस कंपनी, दानापूर बिहार आणि स्पोर्टस ऍथॉरिटी ऑफ गुजरात या दोन संघांनीही प्रवेश निश्‍चित केल्यानंतर माघार घेतली.

या संदर्भात स्पर्धा समन्वयक फिरोज शेख म्हणाले,””संघाच्या माघारीचा स्पर्धेवर चांगलाच परिणाम झाला. स्पर्धेचा “ड्रॉ’मध्ये ऐनवेळी बदल करावा लागला. संघांच्या माघारीची दखल आम्ही घेतली असून, या संदर्भात हॉकी इंडियाकडे विचारणा केली आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.