Lavasa Hill Station : लवासा हिल स्टेशन बेकायदा? शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना नोटीस

एमपीसी न्यूज : लवासा हिल स्टेशन (Lavasa Hill Station) प्रकल्प विरोधात केलेल्या याचिकेची दखल आता सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणावर सहा आठवड्याच्या आत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काही वर्षांपूर्वी ऍड. नानासाहेब जाधव यांनी लवासा प्रकल्प बेकायदा असल्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यातच निकाली काढली होती. त्यामुळे याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर (Lavasa Hill Station) न्यायालयाने यातील सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावली आहे. सहा आठवड्यात प्रतिज्ञापत्रद्वारे आपली भूमिका मांडण्यास या नोटीसीद्वारे सांगण्यात आले आहे.

Lonavala Rain : लोणावळ्यात पावसाचा जोर कायम; 24 तासात 130 मिमी पावसाची नोंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.