-MPC-TOP-MOST-BANNER-I

Hinjawadi : फी म्हणून दिलेले पैसे परत मागत वकिलाला मारहाण

Lawyer beaten while demanding refund of the fees.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – वकिलाला केस चालविण्यासाठी फी म्हणून दिलेले पैसे परत मागत एकाने वकिलाला मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शनिवारी (दि. 13) दुपारी भुजबळ वस्ती, वाकड येथे घडला.

चंद्रशेखर शिवाजी भुजबळ (वय 36, रा. भुजबळ वस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र नेताजी भुजबळ (वय 30, रा. जमदाडे वस्ती, हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रवींद्र याने त्याच्यावर असलेल्या घटस्फोटाची आणि अपहरणाची केस फिर्यादी चंद्रशेखर यांना चालविण्यासाठी दिल्या होत्या. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांनी आरोपीकडून चार लाख रुपये फी म्हणून घेतले होते.

शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमरास आरोपी हा फिर्यादी यांच्या घरात आला. ‘माझ्या सर्व केस तुला चालवायला दिल्या होत्या. त्या सर्व केसेस मध्ये तू विरुद्ध पार्टीकडून मॅनेज झाला. मी तुला दिलेले चार लाख रुपये सहा महिन्यापासून मागत आहे. ते आजच्या आज परत दे’ असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांना मारहाण केली.

आरोपीने फिर्यादी यांच्या बोटाला चावा घेतला. तसेच आरोपीने शिवीगाळ करत पैसे न दिल्यास फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.